- मका पिकांसह सोलर पंपाचेही नुकसान
अर्जुनी मोरगाव,
Elephant stampede in Kawatha, Dongargaonरानटी हत्तींनी तालुक्यातील वडेगाव/बंध्या परिसरात शेकडो एकर शेती उध्वस्त केल्यानंतर आता आपला मोर्चा गोठणगाव, प्रतापगड, कालीमाती परीसरातील गावांकडे वळविला असून या परिसरातील मका पिकासह शेतातील सोलर पॅनलचीही नासधूस केल्याची घटना पुढे आली आहे.
Elephant stampede in Kawatha, Dongargaon३० ते ३५ च्या संख्येत असलेल्या हत्तीच्या कळपाचे दोन गटात विभाजन होत एक गट एमटीडीसी नवेगावबांध परीसरात तर दुसर्या गटाने कवठा, डोंगरगाव, बोळदे परीसरात बस्तान मांडले आहे. दरम्यान, या कळपाने १५ एप्रिल रोजी बोळदे येथील सिताराम कवळु मेंढे यांचे शेतातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याच रात्री मंगलमुर्ती रामटेके यांचे शेतातील सोलर पॅनलची पुर्नत: नासधुस केली आहे. हत्तीच्या कळपाने शेतीतील पिकांसह सिंचनाच्या सामुग्रीचेही मोठ्या प्रमाणात नासधुस केल्याने नुकसानग्रस्त शेतकरी रडकुंडीस आले आहेत. तर आणखी किती दिवस या हत्तीच्या कळपाचा मुक्काम अर्जुनी-मोर तालुक्यात राहतो. हे येणारे काळच सांगणार आहे. दरम्यान, हत्तीमुक्त तालुका करा अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत असले तरी वनविभाग मात्र, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यातच मगशुल असल्याचे दिसून येत आहे.