राळेगावात जिनिंगला भीषण आग

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
पहाटेचा थरार
लाखो रुपयांचा कापूस जळून खाक

राळेगाव, 
Fire at Ralegaon Ginning राळेगाव ते मेटीखेडा असलेल्या महावीर जिनिंगला शुक‘वार, १७ एप्रिलला पहाटे ३.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जिनिंगमध्ये साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच यवतमाळ आणि राळेगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक परिश्रमांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पहाटेच्या वेळी लागलेल्या या आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केल्याने जिनिंग परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
 

aag 
 
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आगीचा प्रसार रोखता आला आणि आजूबाजूच्या होणारे मोठे नुकसान टाळले गेले. 
 
Fire at Ralegaon Ginning या आगीत झालेल्या नुकसानाचा नेमका आकडा पंचनाम्यानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिनिंग व्यवस्थापन आणि महसूल विभागाने घटनास्थळाची पाहणी केली असून, झालेल्या नुकसानाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत कापूस प्रकि‘या उद्योगांनी आगीबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले. येथील अग्निशमन दलाने अग्निशमन अधिकारी विनोद खरात यांच्या नेतृत्वात वाहनचालक राहुल यादव, फायरमन हेमंत डोंगरे, रवी चौधरी यांनी आपली चोख कामगिरी बजावली तर राळेगाव येथील अग्निशमन पथकातील कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.