यवतमाळ जिल्ह्यात ८१६ अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
पीएमएफएमई योजनेतून प्रकल्पांना बळ
उद्योगांना शासनाचे ३५ टक्के अनुदान
महिला सक्षमीकरणाला गती
 
यवतमाळ, 
Food processing industry जिल्ह्यात कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’ (पीएमएफएमई) योजना ‘गेम चेंजर’ ठरत आहे. २०२०-२१ ते २०२५-२६ या वर्षांच्या कालावधीत जिल्ह्याने या योजनेत उल्लेखनीय प्रगती केली आहे. आतापर्यंत ८१६ प्रकल्पांची यशस्वी उभारणी झाली आहे.
 
 
food
 
विशेष म्हणजे, या उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात १९७२ नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला गती दिली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील लघुउद्योजकांना हक्काचे भांडवल उपलब्ध झाले असून त्यांच्या आर्थिक सक्षमतेला आधार मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रकि‘या उद्योगांचे एकूण मूल्य २७४५ लाख रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये शासनाने खंबीर साथ देत आतापर्यंत १०५२ लाख रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्यात आले आहे.
गृहउद्योगातून रोजगार निर्मिती :
Food processing industry  स्थानिक उपलब्ध कच्च्या मालावर आधारित प्रकि‘या उद्योगांकडे युवक आणि महिलांचा कल अधिक आहे. त्यामध्ये ४५८ मसाला उद्योग प्रकल्प कार्यान्वित असून त्यातून ९२३ जणांना रोजगार मिळत आहे. ११५ गहू प्रक्रिया प्रकल्पांमधून १८५ जणांना काम मिळाले आहे. जिल्ह्यात कडधान्यावर आधारित १०६ उद्योगातून २२६ जणांना रोजगार मिळाला आहे. ३६ दुग्धप्रकि‘या उद्योग प्रकल्प यशस्वीपणे सुरू असून ९४ जणांना रोजगार मिळाला आहे. आरोग्यदायी संकल्पनेवर आधारित २५ तेलघाणा प्रकल्पांनी स्वतंत्र ओळख निर्माण त्यातून ६२ जणांना तर ७६ इतर उद्योगांतून ४८२ जणांना रोजगार प्राप्त झाला आहे.
योजनेचा मुख्य उद्देश :
पीएमएफएमई योजनेचा मुख्य उद्देश ही सूक्ष्म अन्न प्रकि‘या उद्योगांना तांत्रिक आणि वित्तीय बळ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात या स्वयंरोजगाराचे मोठे जाळे विणले जात आहे.
थोडक्यात आढावा (२०२०-२१ ते २०२५-२६)
एकूण प्रकल्प संख्या  : ८१६
एकूण गुंतवणूक (मूल्य) : २७४५ लाख
वितरित अनुदान : १०५२ लाख
निर्माण झालेला रोजगार : १९७२
गेल्या पाच वर्षांतील ही आकडेवारी स्पष्ट करते की, यवतमाळ जिल्हा आता ’प्रक्रिया उद्योगांचे केंद्र’ म्हणून नावारूपास येत मसाला आणि गहू प्रक्रिया उद्योगांमधील भरघोस वाढ जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी ठरणारी आहे.
मनोज ढगे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
आर्थिक परिवर्तनाचे साधन
Food processing industry  पीएमएफएमई योजना ही जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाचे साधन बनत आहे. यवतमाळमधील ८१६ प्रकल्पांनी हे सिद्ध केले आहे की, येथील तरुण आणि महिला वर्ग नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देणारे बनत आहेत. जिल्ह्याला ‘अन्न प्रक्रिया हब’ बनवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
जिल्हाधिकारी विकास मीना