अनिल कांबळे
नागपूर,
digital arrest शहरात सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत टपाल विभागातील निवृत्त अधिकाèयाची तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. या प्रकरणी सायबर पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित (वय 63) हे नुकतेच टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत. 4 एप्रिल राेजी त्यांना व्हिडिओ काॅल आला. काॅल करणाऱ्याने स्वतःला अधिकारी असल्याचे सांगत गंभीर आराेप केले. ठगांनी त्यांना अश्लीलता प्रसारित करणे, मनी लाॅन्डरिंग आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या प्रकरणांत सहभागी असल्याचे सांगून त्यांच्या विराेधात गुन्हा दाखल असून अटक वाॅरंट जारी झाल्याची खाेटी माहिती दिली. इतकेच नव्हे तर ठगांनी बनावट पाेलिस तपासाशी संबंधित कागदपत्रेही पाठवली.कारवाईपासून वाचवण्याच्या नावाखाली त्यांनी पैशांची मागणी केली.digital arrest भीतीपाेटी पीडितांनी 4 ते 13 एप्रिल दरम्यान विविध व्यवहारांतून एकूण 79 लाख रुपये ठगांच्या खात्यात जमा केले. त्यानंतरही अधिक पैशांची मागणी हाेत राहिल्याने पीडितांना फसवणुकीचा संशय आला. त्यांनी तत्काळ सायबर पाेलिसांशी संपर्क साधून तक्रार नाेंदवली. पाेलिस पुढील तपास करत आहेत.