कृत्रिम तुटवड्याच्या अफवांवर प्रशासनाचे लक्ष

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |

वणीतील पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना

वणी,
Fuel supply rumors यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडर व सीएनजीचा पुरेसा पुरवठा उपलब्ध असतानाही तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी वणी शहरासह परिसरातील पेट्रोल पंप व गॅस मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या काटेकोरपणे पाळण्याचे आदेश संबंधित वितरकांना देण्यात आले आहेत. मात्र, या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे.
 
 
petrol
 
वणी तालुका निरीक्षक अधिकारी, अन्न व नागरी पुरवठा विभाग यांना याबाबत आलेल्या निवेदनात नियंत्रण पथकाच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पेट्रोल पंप व गॅस वितरकांकडे होणारी अनावश्यक गर्दी टाळून नागरिकांना नियमित व योग्य प्रमाणात इंधन व गॅस उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
Fuel supply rumors दरम्यान, १४ एप्रिल रोजी वणी शहर व आसपासच्या पेट्रोल पंपांवर डिझेलचा तात्पुरता तुटवडा निर्माण झाल्याची घटना घडली होती. शहरात अनेक सरकारी कंपन्यांचे पेट्रोल पंप असतानाही अशी परिस्थिती निर्माण होणे चिंताजनक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार अधिक साठा मंजूर करून इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून कृत्रिम तुटवडा रोखावा व दिलासा द्यावा, अशी अपेक्षा भाजपाचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य दिनकर पावडे यांनी व्यक्त केली आहे.