‘घबाडकुंड’मध्ये संदीप पाठकचा भन्नाट अवतार

गूढ विहिरीतील थरार प्रेक्षकांसमोर

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
मुंबई,
ghabadkund मराठी चित्रपटसृष्टीत चाकोरीबाहेरील भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता संदीप पाठक आता पुन्हा एकदा नव्या आणि अनोख्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विनोदी तसेच गंभीर भूमिकांमध्ये आपली छाप पाडणाऱ्या पाठकचा ‘घबाडकुंड’ या आगामी चित्रपटातील लूक आणि व्यक्तिरेखा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
 

ghabadkund marathi-movie-sandeep-pathak-thriller-teaser-2026 
‘घबाडकुंड’ या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला टीझर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरला आहे. या चित्रपटात संदीप पाठक ‘दिल्या’ ही व्यक्तिरेखा साकारत असून त्याचा आजवर न पाहिलेला वेगळा अंदाज यात पाहायला मिळत आहे. सोन्याच्या मोहापोटी एका गूढ विहिरीत उतरलेल्या दिल्याची कथा या चित्रपटातून उलगडणार असून त्या विहिरीमागचं रहस्य काय आहे, याची उत्सुकता टीझरमधून अधिकच वाढली आहे.
 
 
यापूर्वी ‘अल्याड-पल्याड’मधील ghabadkund गूढ आणि थरारक घटनांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘दिल्या’ आता ‘घबाडकुंड’च्या नव्या कथानकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटातून मराठीत एक वेगळं आणि कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निर्माते डॉ. रसिक कदम यांची साथ लाभली आहे. येत्या १९ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
 
चित्रपटातील आपल्या ghabadkund भूमिकेबद्दल बोलताना संदीप पाठकने सांगितले की, ‘घबाडकुंड’मध्ये दिल्या साकारताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. ‘अल्याड-पल्याड’मधील व्यक्तिरेखेपासून पूर्णपणे वेगळा आणि अधिक गूढ स्वरूपाचा दिल्या प्रेक्षकांसमोर आणणे ही मोठी जबाबदारी होती. विशेषतः विहिरीत उतरतानाचे दृश्य चित्रीत करताना भीती, थरार आणि वास्तव यांचा समतोल राखणे ही खरी कसोटी होती, असे तो म्हणाला.एकूणच, ‘घबाडकुंड’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना एक वेगळा आणि थरारक अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संदीप पाठकच्या या नव्या अवतारामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.