‘मला कोणताही पश्चात्ताप नाही’

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
मुंबई
Hansika Motwani बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून पुढे अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर ठसा उमटवणारी हंसिका मोटवानी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या अवघ्या तीन वर्षांत पती सोहेल कथुरिया याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता तिने प्रथमच आपल्या भावनांबद्दल भाष्य केले आहे.
 

Hansika Motwani divorce 
मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने ११ मार्च २०२६ रोजी हंसिका आणि सोहेल कथुरिया यांना परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला. डिसेंबर २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलेला त्यांचा विवाह काही वर्षांतच मतभेदांमुळे अडचणीत आला होता. जुलै २०२४ पासून दोघेही वेगळे राहत होते आणि अखेर त्यांनी कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतर दीर्घकाळ मौन बाळगलेल्या हंसिकाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्याविषयी मोकळ्यापणाने संवाद साधला. तिने थेट घटस्फोटाचा उल्लेख टाळला असला, तरी आपल्या निर्णयाबद्दल तिला कोणताही पश्चात्ताप नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. “लोकांना खळबळजनक बातम्या हव्या असतात, पण मी कधीही स्पष्टीकरण देणार नाही. जर तुम्ही चुकीच्या गाडीत बसलात, तर त्यातून खाली उतरणं हेच योग्य,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. या कठीण काळात कुटुंबियांचा भक्कम पाठिंबा मिळाल्याचेही तिने सांगितले. हंसिकाने लग्न आणि मातृत्वाबाबत समाजातील ठराविक अपेक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिलांवर ठराविक वयात लग्न किंवा मातृत्व स्वीकारण्याचा दबाव का टाकला जातो, असा सवाल करत तिने आजच्या महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला. “आजच्या मुली स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. इतरांनी ठरवून दिलेल्या चौकटीत बसण्याची गरज नाही,” असे ती म्हणाली.
समाजातील बदलत्या Hansika Motwani विचारसरणीचा उल्लेख करत तिने पूर्वीच्या आणि आताच्या अपेक्षांमधील विरोधाभासही अधोरेखित केला. “कधी २५, कधी ३०, तर आता ४० व्या वर्षी लग्न करा असे सांगितले जाते. लग्नानंतर लगेच मूल होण्याचा दबावही टाकला जातो. पण जर ते योग्य वाटत नसेल, तर तो निर्णय घेण्याची जबरदस्ती का?” असा सवालही तिने उपस्थित केला.हंसिकाच्या या स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणि समाजमाध्यमांवर चर्चेला उधाण आले आहे.