यवतमाळ,
Jawahar Navodaya Vidyalaya results 100 percent बेलोरा येथील पीएमश्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाचा शैक्षणिक सत्र २०२५-२६ चा सीबीएसई १० वीचा निकाल १०० टक्के लागला या परीक्षेला एकूण ७६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून, त्यापैकी ७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ६५ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे.
Jawahar Navodaya Vidyalaya results 100 percent विद्यालयातून सात्विक गजानन गुंडेवार याने ९७.५० टक्के गुण मिळवून प्रथम क‘मांक पटकावला आहे. राज गादेवार याने ९७.३३ टक्के गुणांसह द्वितीय आणि शिवम मनोहर काळे याने ९६.५० टक्के गुण मिळवून तृतीय क‘मांक प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक विषयांतही उत्तम कामगिरी केली आहे. एकूण ७६ पैकी ५४ विद्यार्थ्यांनी मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विक‘म प्रस्थापित केला. तसेच कौशल विकास अंतर्गत ‘फिजिकल अॅक्टिव्हिटी ट्रेनर’ विषयात ३७ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य कमलाकर घोपटे, उपप्राचार्य सुनील उराडे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.