कोराडी येथे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नागपूर,
koradi-dr-ambedkar-jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महादुला-कोराडी परिसरातील बौद्ध विहार येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 
 
 

koradi-dr-ambedkar-jayanti
 
 
 
कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अमित वानखेडे व डॉ. कल्याणी कापसे यांनी शिबिरात आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली. शिबिराच्या आयोजनासाठी ममता कुंभलवार , अभि बनसोड, रक्षा मंडपे व विठाई अंदुलकर यांनी सहकार्य केले.
या आरोग्य शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा लाभ झाला असून सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम ठरला.