अनिल कांबळे
नागपूर,
two students killed in accident महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वसतीगृहात राहणाऱ्या दाेन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला. दाेन्ही विद्यार्थी रात्री जेवण करून वसतीगृहात परत येताना कच्च्या रस्त्यावरील खाेलगट भागात दुचाकी उसळून त्यांचा अपघात झाला. विद्यापीठाजवळच निर्जन ठिकाणी ही घटना घडली. एका विद्यार्थ्याचे वडील न्यायाधीश असून दुसऱ्या विद्यार्थ्याचे वडील वकील आहेत. या प्रकारामुळे विधी विद्यापीठासह खळबळ उडाली आहे. सक्षम विनाेद बन्साेड (20, पिरॅमिड सिटी, बेसा) व आर्यन रविंद्र साेनटक्के (20, यवतमाळ) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

सक्षम आणि आर्यह हे दाेघेही महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी हाेते. सक्षमचे वडील विनाेद बन्साेड हे वर्धा येथे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी असून आर्यनचे वडील रविंद्र साेनटक्के हे यवतमाळ येथे वकील आहेत. सक्षम व आर्यन विधी विद्यापीठाच्या वसतीगृहात राहत हाेते. बुधवारी रात्री ते दाेघे आणखी एका मित्रासह जेवायला गेले हाेते. येताना सक्षम व आर्यन एकाच माेटारसायकलवर हाेते, तर त्यांचा मित्र दुसèया दुचाकीवर हाेता. तिघेही वर्धा मार्गावरून जेवण करून मध्यरात्रीच्या सुमारास परत आले. तिसरा मित्र वसतीगृहाच्या दिशेने आत गेला. मात्र सक्षम व आर्यन संस्कृत विद्यापीठाच्या दिशेने गेले. तेथे अंधार हाेता व वळणावर त्यांचे संतुलन बिघडले व दाेघेही खाेलगट भागात जाऊन पडले. संबंधित ठिकाणी माेठ्या प्रमाणावर दगड असल्यामुळे ते जखमी झाले. घटनास्थळ निर्जन हाेते व आजुबाजूला कुणीच नव्हते. रात्रभर ते तेथेच जखमी अवस्थेत पडले राहिले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी विधी विद्यापीठाशी संबंधित एक कर्मचारी त्या मार्गाने येत असताना त्याला दाेघेही निपचित पडलेले दिसले.two students killed in accident काही अंतरावर त्यांची माेटारसायकल पडली हाेती. त्याने तातडीने विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली. पाेलिसांनादेखील हे कळविण्यात आले. दाेघांनाही एम्समध्ये नेले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. या घटनेमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना माेठा धक्का बसला आहे. एम्समध्येच शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
पाेलिसांची माहिती देण्यास टाळाटाळ
काही दिवसांअगाेदर विद्यार्थिनींच्या वसतीगृहात रॅगिंगचे प्रकरण समाेर आले हाेते. या प्रकरणात विद्यापीठ व पाेलिसांकडून गाेपनीयता बाळगण्यात आली हाेती. आता या अपघात प्रकरणातदेखील पाेलिसांकडून कुठलीच माहिती देण्यात आली नाही. बुटीबाेरीचे प्रभारी ठाणेदार निलेश चावरे यांनीही प्रसारमाध्यमाला घटनेबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली.
... तर वाचला असता जीव
आर्यन आणि सक्षम यांची दुचाकी खड्ड्यातून उसळली आणि थेट रस्त्याच्या खाली खाेलगट भागात जाऊन पडली. अपघात स्थळावर माेठमाेठे दगड हाेते. त्या दगडाचा मार दाेघांनाही लागला. त्यामुळे दाेघेही रक्तबंबाळ झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे रात्रभर ते त्याच ठिकाणी पडून हाेते व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जर रात्रीच जखमींना उपचारासाठी मदत मिळाली असती तर दाेघांचाही जीव वाचला असता.