नारीशक्ती वंदन अधिनियमाला समर्थन

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
वर्धेत भाजपा महिला आघाडीची रॅली
 
वर्धा, 
Nari shakti vandan Act महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि राजकीय सहभागाला बळ देणार्‍या नारीशक्ती वंदन अधिनियम या ऐतिहासिक निर्णयाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वर्धा जिल्हाच्या वतीने १६ रोजी सायंकाळी महिला पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत पहिल्यांदाच शेकडो महिला उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या.
 

rally 
 
स्थानिक झाशी राणी पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. पदयात्रेत महिला शतीच्या एकजुटीचा, आत्मविश्वास दिसुन आला. सशत महिला, सशत भारतच्या घोषणेत या रॅलीत समाजातील सर्व क्षेत्रात काम करणार्‍या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बचत गट महिला, सामाजिक व धार्मिक संस्था, महिला मंडळ, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, लाभार्थी महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या.
 
 
आज देशाच्या स्वातंत्र्यांच्या इतया वर्षानंतर प्रथमच महिलांना लोकसभा व विधानसभेमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले. ते विधेयक पास झाल्यास देशातील लोकशाहीमध्ये अभूतपूर्वक्रांती नक्कीच बघायला मिळेल. या विधेयकाच्या समर्थनार्थ वर्धेतील विविध सामाजिक संघटनांनी भाजपा महीला मोर्च्या सोबत रॅली काढली. विधेयकाला संमती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आभारचे पोस्ट कार्ड पोस्ट पाठवलेे व विधेयकाच्या समर्थनार्थ अभियान राबवण्यात आले.
 
 
Nari shakti vandan Act  नारी शती रॅलीत भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, महामंत्री श्रेया देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्चना वानखेडे, महिला मोर्चा महामंत्री माधुरी इंगळे, वर्धा विधानसभा प्रमुख चित्रा ठाकूर, हिंगणघाटच्या नगराध्यक्ष नयना तुळसकर यांच्यासह जिल्ह्यातील नगरसेविका, भाजपा महिला पदाधिकारी, सामाजिक संस्थेच्या महिला कार्यकर्त्या प्रामुख्याने उपस्थित होते.