फ्री डिलिव्हरीचा ‘गोड गुंता!’

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
वेध
रेवती जोशी-अंधारे
Online shopping सध्याच्या काळात ‘क्विक नावाची एक भयंकर सोय आपल्या सेवेत हजर आहे. भयंकर यासाठी की, ही सेवा नकळत आपल्या निर्णयक्षमतेला प्रभावित करू लागली आहे. एका क्लिकवर दूध-दह्यापासून गहू-तांदळापर्यंत, चपला-जोड्यांपासून औषधांपर्यंत प्रत्येक वस्तू काही मिनिटात दारात हजर होते. ही अतिशय आधुनिक आणि परिपूर्ण सुविधा आता घरातील प्रत्येकाच्या हातातील मोबाईलमध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. इतकी की ती स्वत:च्या अस्तित्वाची आठवण सतत करून देते. अलाउद्दीनच्या दिव्यासारखी ही सुविधा मूलभूत गरज बनली आहे. मग त्या वस्तूंची खरंच गरज असो किंवा नसो, वस्तू दारात येऊन तयारच!
 
 
online
 
Online shopping  ऑनलाईन शॉपिंग म्हणजे आधीच एक व्यसन आणि त्यात अमुक एका रकमेची खरेदी करा आणि फ्री डिलिव्हरी मिळवा, अशी लक्षवेधी गळ घातली सामान्य माणूस सहज त्या ‘गळाला’ लागतो. खरे तर तातडीने गरज असते, एक लिटर दुधाची! साधारण ५० रुपयाचे दुधाचे पाकीट डिलिव्हरी चार्जेससोबत ८० रुपयांचे होताना बघून आपला जीव दडपतो. त्याच क्षणी मेसेज येतो, ‘काही विसरलात का?’ मग, दही, बटर, चीझ, ताक असे पर्याय येतात आणि सोबत ‘फक्त २५ रुपयांची खरेदी मिळवा फ्री डिलिव्हरी!’ हा मेसेजही येतो. ही चांगली ऑफर आहे, असे म्हणून आपण एक पाकीट बटर आपल्या ऑनलाईन कार्टमध्ये अ‍ॅड करतो. त्याच क्षणी आपण फ्री डिलिव्हरीपासून फक्त २० रुपये दूर असल्याचे सांगणारा मेसेज येतो आणि ब्रेड, ब्राऊन ब्रेड, पावाचे अनेक प्रकार पुढ्यात येतात. ‘अरे हो! बटरसोबत ब्रेड हवीच’ या विचाराने एक ब्रेडचं पाकीट आपण अ‍ॅड करतो. तोपर्यंत, १० रुपयांच्या आईसकँडीज्, कोल्डड्रिंक अशी जंत्री पुढ्यात हजर होते. १०-२० रुपयांची आणखी खरेदी करून, पेमेंट करून आपण मोकळे होतो. म्हणजे ५० रुपयांच्या दुधाच्या पाकिटापासून सुरू झालेली खरेदी दीडशे रुपयांपर्यंत संपते. नकळत आपण ‘क्विक कॉमर्स’च्या जाळ्यात अलगद अडकलेले असतो. कोणत्याही ऑर्डरची किमान हा विचार करण्याचा विषय आहे. ५० रुपयांच्या वस्तूचीच गरज असताना, केवळ डिलिव्हरी शुल्क द्यावे लागू नये म्हणून आपण २०० रुपयांची खरेदी करून टाकतो. खर्च वाढत जातो, ठळक दिसेल असा नाही तर गुपचूप! क्विक कॉमर्सच्या जगात आपल्या या वागणुकीचा अभ्यास करणारी यंत्रणा अखंड काम करते आहे. ‘बिहेव्हियरल इकॉनॉमिस्ट्स’ या प्रक्रियेला स्पेंडिंग’ असं म्हणतात. जेव्हा पैसे देण्याची प्रक्रिया इतकी सोपी असते तेव्हा अगदी सहज आपलं त्याकडे लक्षही जात नाही. यात दुसरा प्रकार क्रेविंग्जचा आहे. रात्री-अवेळी काहीतरी खायची इच्छा होणं, म्हणजे ‘क्रेविंग’. अशा स्थितीत दोन पर्याय असतात. त्या क्षणी संयम बाळगून शांत राहणे म्हणजे दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत आपण विसरतो. दुसरा पर्याय कशाला मारायचं? या कॅटेगरीतील असतो. झटपट ऑर्डर करायची, दारात आलेल्या चीजवस्तूचा आनंद घ्यायचा आणि महत्त्वाचं म्हणजे बिनदिक्कत जास्तीचे पैसे खर्चायचे. ‘मिनिमम कार्ट व्हॅल्यू’च्या या गोड आणि नकळत लादल्या जाणार्‍या दबावतंत्रातून बाहेर यायला हवं. ‘हे देखील घेऊनच टाकू या...’ हा विचार अनावश्यक आणि जास्तीच्या वस्तू प्रत्येक फ्री डिलिव्हरीसोबत येतात. महिन्याच्या इतके पैसे आपण कशावर खर्च केले, हेसुद्धा नंतर आपल्याला जाणवत नाही. थोडं थांबून, पुन्हा विचार करून निर्णय घ्यायला आपल्याला वेळ द्यायचा नाही, हे क्विक कॉमर्सचे मूळ सूत्र आहे. या विविध अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदीचा नेमका फायदा घेणं, विविध ऑफर्सचे कूपन अप्लाय करणं आणि संयमित खरेदी करणं हे ग्राहक म्हणून आपलं आहे. खरेदीसाठी याद्या बनविणं, कोपर्‍यावरचा भाजीवाला किंवा वाण्याशी घरगुती संबंध असणं, त्यांच्याकडे उधारीची खाती चालविणं, दूध-ब्रेडसाठी थोडं चालत जाणं या सगळ्यांतून थोडे पैसे वाचविणे, संयमाची सवय, लोकांशी संवाद आणि ‘डिजिटल डिटॉक्स’ असे फायदे नक्कीच होतात.
 
 
हे अ‍ॅप बिनकामाचे आहेत किंवा क्विक कॉमर्स वाईट आहे, असे नाही. ती एक वेळ सोय आहे. फक्त, त्याची सवय लागता कामा नये. या नियंत्रणामुळे जीवनात खूप आमूलाग्र बदल वगैरे होणार नाहीत, पण, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी मात्र नक्कीच सुधारतील आणि माणसात आल्यासारखं वाटेल. १० मिनिटांच्या सोयीसाठी आपण काय गमावत आहोत, ते स्पष्ट होईल. खूपच आवश्यक असेल तेव्हाच दैनंदिन खरेदी या अ‍ॅप्सवरून करा. मनमौजी न संयमाची गुरुकिल्ली शोधा. Online shopping  ऑनलाईन नाही हो...तुमच्याचजवळ! 
 
९८५०३३९२४०