परतवाडा दोषींना फाशीची शिक्षा द्या

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
महिला संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

यवतमाळ, 
Parthwada sexual abuse and blackmail case परतवाडा येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात सुमारे १८० हून अधिक युवतींचे शोषण झाल्याची माहिती समोर येताच संतापाची लाट उसळली आहे. मुख्य आरोपी मोहंमद अयाजसह सहकार्‍यांनी शेकडो अश्लील व्हिडिओ तयार करून प्रसारित केल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्यासह सर्व दोषींना फाशीचीच शिक्षा द्यावी, या मागणीचे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत शुक‘वार, १७ एप्रिलला पाठवण्यात आहे. यावेळी शहरातील विविध महिला संघटना मोठ्या सं‘येने उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी विकास मीना आणि उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी आपल्या भावना शासनाला कळवू, जिल्ह्यात महिला सुरक्षा उपाययोजना करू, असे आश्वासन दिले.
 
 
magani
 
निवेदनात आहे की, आरोपीने युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले व त्याचे चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून हा केवळ वैयक्तिक गुन्हा नसून संघटित गुन्हेगारीचा भाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात मोक्का आणि अल्पवयीन मुलींचा समावेश असल्यास ‘पोक्सो’अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाचा तपास व जलद व्हावा यासाठी विशेष तपास पथक नेमण्याची आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच, सायबर गुन्हेगारीच्या अनुषंगाने सर्व व्हायरल व्हिडिओ तत्काळ हटवून ते प्रसारित करणार्‍यांवरही कठोर कारवाई करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
 
 
Parthwada sexual abuse and blackmail case  निवेदन देतांना गीता परिवारच्या डॉ. निकिता चव्हाण, शुभांगी बोडखे, शकुंतला प्रजापती, योग सेवा समितीच्या नीता मुंदाफळे, दीपा वैद्य, सनातनच्या कल्पना राऊत, रूपाली कांबळी, दारूबंदी आणि स्त्रीशक्ती संघटनेच्या संगीता पवार, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉ. महेश चव्हाण, स्वयंदीप नॅचरोपॅथी सेंटरचे संचालक डॉ. दीपक घरझोडे, मंदिर महासंघाचे महादेव काचोरे, हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय फोकमारे, राम धारणे, श्रीकांत सास्तीकर उपस्थित होते.