उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

यवतमाळ, 
Prevention of heatstroke जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

heatstroke 
 
काय करावे :
नागरिकांनी तीव‘ उन्हात, विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर टाळावे. शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे.
 
 
Prevention of heatstroke उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी अशा घरगुती शीतपेयांचे सेवन करावे. तसेच पशुधनाला सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी द्यावे. उष्माघात झालेल्यांची काळजी घेताना त्यांना त्वरित थंड जागी हलवावे आणि शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. ओल्या कपड्याने अंग पुसून थंड करावे तसेच ओआरएस, लस्सी, ताक किंवा लिंबूपाणी बाधित व्यक्तीला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

काय करू नये :
याचबरोबर प्रशासनाने काही गोष्टी टाळण्याचेही आवाहन केले आहे. त्यानुसार दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे टाळावे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालू नयेत. बाहेर तापमान जास्त असल्यास जास्त शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे.