अनिल कांबळे
नागपूर,
student kidnapped प्रेयसीसाेबत मैत्री ठेवल्यावरुन झालेल्या वादातून 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. ही घटना सीताबर्डी पाेलिस ठाणे हद्दीतील धरमपेठ परिसरात घडली. पाेलिसांनी या प्रकरणी अपहरण व मारहाणीचा गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी आणि आराेपी सलमान खान (वय 28, रा. जाफर नगर) तसेच सैी (वय 18, रा. सदर) हे एकमेकांना ओळखत हाेते. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्याने आपल्या मैत्रीणीची ओळख सलमानशी करून दिली हाेती. त्यानंतर आठवडाभरापूर्वी सलमान आणि त्या विद्यार्थिनीमध्ये वाद झाला हाेता. 14 एप्रिल राेजी ताे विद्यार्थी आपल्या मैत्रीणीसाेबत हाॅस्टेलमध्ये हाेता. त्याचवेळी सलमानने त्याला फोन करून ‘तू कुठे आहेस’ असे विचारले. विद्यार्थ्याने आपण पिकेलाे कॅेमध्ये असल्याचे खाेटे सांगितले. काही वेळातच सलमान आणि सैी हाॅस्टेलवर आले. त्याना ताे विद्यार्थी मैत्रिणीसाेबत दिसला. त्यांनी विद्यार्थ्याला जबरदस्ती कारमध्ये बसवून माेमिनपुरा येथे नेले.student kidnapped तेथे एका खाेलीत बंद करून आराेपींनी विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण केली. हाॅस्टेलमध्ये असूनही चुकीची माहिती दिल्याचा आराेप करत त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी आराेपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही काढला. कशीतरी आराेपींच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर विद्यार्थ्याने सीताबर्डी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून पुढील तपास सुरू केला आहे.