पतीच्या त्रासामुळे पत्नीची आत्महत्या

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
पतीला अटक

आर्णी, 
suicide तालुक्यातील बोरगाव येथे काल रात्री भाजी जमली नाही, या कारणावरून पती-पत्नीत झालेल्या वादात पत्नीने घरात विष प्राशन केले. तिला आर्णीला दवाखान्यात आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. बोरगाव येथील नामदेव जाधव याचे लग्न देवगाव येथील चेतनाशी झाले होते. यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मनोज हा दारूच्या आहारी गेला असून नेहमी पत्नीसोबत वाद घालायचा. यातच गुरुवारी रात्री मनोज आपल्या मित्राला घरी घेऊन आला.
 
 
sui
 
suicide दोघेही जेवायला बसले असता मनोजने पत्नी चेतनासोबत भाजी चांगली झाली नाही यावरून वाद घातला. चेतना घरात गेली आणि विष पिऊनच बाहेर आली व म्हणाली, मी पोट भरून विष प्यायली आहे, आता तुम्ही शांतीने रहा. तिला आर्णी दवाखान्यात आणले असता डाक्टरांनी मृत घोषित केले. मृतका चेतनाचे मामा मनोहर राठोड यांच्या तक‘ारीवरून आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक पल्लवी निनगुरकर तपास करीत आहेत.