सुकळी (ज) ग्रामपंचायतच्या श्रद्धा बोके नवीन सरपंच

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
उमरखेड, 
जिल्हा प्रशासनाने Sukali (H) Gram Panchayat सुकळी (ज) ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड प्रकि‘या बुधवार, १५ एप्रिल रोजी राबविली. यावेळी सरपंचपदासाठी ९ सदस्यांमधून केवळ श्रद्धा बोके यांचा अर्ज आल्याने त्या सरपंच म्हणून उर्वरित काळासाठी पात्र ठरल्या आहेत. मागील सार्वत्रिक निवडणुकीत सुकळी (ज) ग्रामपंचायत सरपंच म्हणून प्रणाली मस्के विराजमान झाल्या होत्या. पण ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा न घेणे यासह इतर काही बाबतीत येथील नागरिकांनी जिल्हा ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे गंभीर स्वरूपाच्या तक‘ारी केल्या होत्या.
 

sarpanch 
 
Sukali (H) Gram Panchayat  त्यामुळे सरपंच प्रणाली अपात्र ठरून त्यांना सरपंच पदावरून कमी करण्यात आले होते. त्यानंतर दीड वर्ष या गावचे उपसरपंच शिवाजी रावते यांनी प्रभारी सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला. नवनिर्वाचित सरपंच श्रद्धा बोके भाजपाचे माजी आमदार उत्तम इंगळे व नामदेव ससाने गटाच्या मानल्या जातात. सरपंच श्रद्धा बोके यांचे स्वागत माजी आमदार इंगळे व ससाने यांनी यावेळी डॉ. अयुबखाँ पठाण, ज्ञानेश्वर कनवाळे, ज्ञानेश्वर बोके, राहुल वानखेडे, संतोष वानखेडे तसेच भाजपा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.