सिंदी (रेल्वे),
mango shaped egg निसर्गाच्या किमयेचे अनेक प्रकार आपण ऐकतो. मात्र, सिंदी रेल्वे शहरात सध्या एका वेगळ्याच अंड्याची चर्चा रंगली आहे. येथील बाजार ओळ परिसरातील नंदी चौकातील अंडी विक्रीच्या दुकानात चक्क आंब्याच्या आकाराचे अंड आढळून आले. याची वार्ता परिसरात पसरताच अंड बघण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती.
बाजार ओळीतील नंदी चौकात सचिन तान्हा झाडे यांचे अंडी विक्रीचे दुकान आहे. सचिन दुकानात अंड्यांचे ट्रे लावत असताना त्याला एका ट्रेमध्ये त्यांना आंब्याच्या आकाराचे अंड दिसले. सामान्यतः अंडे लंब वर्तुळाकार असते. मात्र, हे अंडे एका बाजूने वळलेले असून त्याला चक्क आंब्याचा आकार आहे.mango shaped egg आंब्याच्या आकाराचे अंड अशी वार्ता शहरात पसरल्याने ते अंड बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. आंब्याच्या आकाराच्या अंड्यामुळे निसर्गाचा हा चमत्कार की काही वेगळा प्रकार अशी चर्चा आता शहरात ठिकठिकाणी रंगू लागली आहे.