वर्धा,
woman started five businesses जिल्ह्यातील बरेच कुटुंब आपल्या पारंपरीक शेतीवर अवलंबून आहेत. स्वयं सहाय्यता समूह गटाच्या माध्यमातून असंख्य कुटुंबांना व्यवसाय व उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण होत आहेत. देवळी तालुक्यातील रोहणी प्रभागातील ज्योत्सना दाते यांनी पाच व्यवसाय सुरू करून इतर गटाच्या महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
रोहणी येथील जय भोले स्वयं सहाय्यता समूह गटाच्या ज्योत्सना दाते या अध्यक्ष आहेत. उमेद अभियानात येण्यापुर्वी त्यांची परिस्थिती बेताची होती. घरी दोन तीन एकर शेती होती. घरातील सर्व सदस्य हे या शेतीत रोजगार मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. एवढ्या कमी शेतीतून मिळणारे उत्पन्नही मोजकेच होते. नवीन काही उद्योग, व्यवसाय सुरू करायचा तर भांडवल कुठून उभे करणार? पीक कर्ज मिळाले तरी शेतीसाठी कमीच पडत होते. तडजोड करीत पुढे जाण्याचा प्रयत्न हा एकच मार्ग त्यांच्या समोर होता. १० जानेवारी २०१४ रोजी त्यांनी काही महिलांना सोबत घेऊन जय भोले स्वयं सहाय्यता समूहाची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून स्वत: जबाबदारी घेतली. सध्या शेती, आटा चक्की, प्रवासी व वाहतूक आणि अॅक्वा प्लांट असे पाच व्यवसाय त्यांच्या गटाने सुरू केले. मुलांचे शिक्षण आणि नंतर त्यांच्या नोकरीचा प्रश्न होता. त्यामुळे मुलांनी काही उद्योग करावा असे त्यांना वाटत होते. उमेदच्या माध्यमातून सहाय्य लाभले. समूह, ग्रामसंघ आणि बँक अशा विविध स्त्रोतातून कर्ज मिळाले. माल वाहतूक व प्रवासी वाहतूक गाडी खरेदी करताना भराव्या लागणार्या रकमेसाठी अभियानाची मदत त्यांना मिळाली.
आता पाण्याच्या बॉटल विकायच्या : दाते
समूहात समाविष्ट झाल्यानंतर समूहाचे अध्यक्ष, सचिव आणि सध्या ग्रामसंघ सचिव अशा विविध जबाबदारी पुर्ण करताना व्यतिमत्त्व विकास झाला. कुटुंबातील आर्थिक निर्णयात सहभाग वाढला. आर्थिकदृष्ट्या साक्षर झाले. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील स्वत:सह सर्व सदस्यांना उपजीविकेची विविध साधने उपलब्ध झाली. त्यामुळे दैनंदिन जीवनात बदल व आर्थिक स्थर उंचावला गेला. अभियानात सहभापूर्वी २ एकर शेती आणि त्यातून मिळणारे मोजके उत्पन्न होते.woman started five businesses आता आपण स्वत: घरकामासोबत आटाचक्की चालवते. एक मुलगा प्रवासी आणि माल वाहतूक बघतो. पती अॅक्वा प्लांटचे काम बघतात. एक मुलगा शेती सांभाळतो. प्रत्येक व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत आहे. सद्या सुरू असलेल्या अॅक्वा प्लांटमध्ये मोठ्या पाणी बॅग भरल्या जातात. आपल्याला १०० मिली ते १ लीटरपर्यंतच्या पाणी बॉटलची निर्मिती आणि विक्री करायची आहे, असे ज्योत्सना दाते यांनी सांगितले.