कारंजा लाड,
gram panchayat elections तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीने आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला असल्याने गावागावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.१७ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने सरपंच पदासाठीच्या एक आणि सदस्य पदासाठीच्या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता कारंजा तालुयातील ग्रामपंचायत पोट निवडणुकीत चार सरपंच पदासाठी ९ तर ९ सदस्य पदासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेणार्यात अंतरखेड सरपंच पदाचे उमेदवार गुणवंत रामराव लाहे, बेलखेड सदस्य पदाचे उमेदवार रुपेश रघुनाथ इंदोरे आणि महागाव सदस्य पदाचे उमेदवार रेखा अरुण चव्हाण यांचा समावेश आहे.नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यापासूनच उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. १७ एप्रिल रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर सरपंच व सदस्यपदासाठी काही ठिकाणी सरळ तर काही ठिकाणी तिरंगी लढत निर्माण झाली आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये एकाच जागेसाठी अनेक उमेदवार मैदानात उतरल्याने निवडणूक अटळ झाली आहे. परिणामी, स्थानिक पातळीवर गटबाजी, बैठका, नेत्यांची मध्यस्थी आणि मतदारांशी संपर्क वाढला आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार १५ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी पार पडली. यात एकही अर्ज बाद झाला नसल्याने सरपंच पदाच्या ४ जगासाठी १० तर १४ सदस्य पदासाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत सरपंच पदासाठीच्या एका आणि सदस्य पदासाठीच्या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.gram panchayat elections त्यामुळे आता चार सरपंच पदासाठी ९ तर १४ सदस्य पदासाठी १३ उमेदवारी अर्ज कायम आहेत.त्यातील ५ सदस्य पदासाठी एकमेव अर्ज असल्याने हे उमेदवार अविरोध निवडून आलेत. काही गावांमध्ये आधीच बिनविरोध निवड निश्चित झाली असली तरी बहुतेक ठिकाणी अजूनही अनिश्चितता कायम आहे. गावपातळीवरील प्रमुख नेते, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आपापल्या गटाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय समीकरणे बदलण्याची शयता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, ज्या ठिकाणी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही, त्या जागांबाबतही प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. तर काही ठिकाणी झालेल्या बहुप्रतिस्पर्धेमुळे मतदान होण्याची शयता अधिक बळावली आहे.
२८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत तालुयातील राजकारण अधिकच रंगतदार होणार असून, ग्रामपातळीवरील सत्तासमीकरणांवर या पोटनिवडणुकीचा मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.