पूनम चेंबर्सचे अनधिकृत बांधकाम दाेन महिन्यांत हटविणार

- न्यायालयाला मागितला मनपाने अवधी : पूनम टाॅवर्सचे बांधकाम हटविले

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
poonam chambers पूनम टाॅवर्सचे अनधिकृत बांधकाम हटविण्याचे काम पूर्ण झाले असून पूनम चेंबर्सचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी दाेन महिन्यांचा अवधी महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला मागितला आहे. पूनम टाॅवर्स व पूनम चेंबर्समधील अनधिकृत बांधकामाशी निगडित दाेन याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. मूळात या दाेन्ही याचिकांमधील एन.कुमार यांची मागणी नाकारून हे बांधकाम अवैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करीत याचिका निकाली काढल्या आहे.
 
 

poonam chambers 
 
केवळ या याचिकेतील अवैध बांधकाम पाडण्याच्या आदेशांच्या पूतर्तेबाबत या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली असता मनपाने पूनम टाॅवर्समधील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती दिली. तसेच पूनम चेंबर्समधील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरिता मनपाने न्यायालयाला दाेन महिन्यांच्या अवधीची मागणी केली. या दाेन्ही अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कामाचे बिल एन. कुमार यांना मनपाने पाठविले आहे. या दाेन्ही इमारतींमधील अवैध बांधकाम पाडण्यात यावे, हे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे.poonam chambers ते आपण पाडू अशी खात्रीही एन. कुमार यांनी दिली हाेती. मात्र, पाडकाम संथ गतीने सुरू असल्याबाबत न्यायालयाने मागील सुनावणीत एन. कुमार यांच्यावर नाराजी व्यक्त केली हाेती. मनपार्ते अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.