जिहादीच्या विरोधात विहिंप, बजरंग दलाचे धरणे आंदोलन

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
VHP, Bajrang Dal hold sit-in protest देशभरात वाढणार्‍या जिहादी मानसिकतेच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आज १७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद केल्यानुसार, नाशिकसह राज्यात घडत असलेल्या अलीकडील घटनांवरून लव्ह जिहादचे जाळे आता सुशिक्षित आणि व्यावसायिक क्षेत्रापर्यंत पसरले आहे. उत्तरप्रदेशातील जिहादी चांगूर उर्फ मालुद्दीन आणि त्याची महिला सहकारी नसरीन यांनी अनेक हिंदू मुलींचे शारीरिक शोषण केले. त्यांना ब्लॅकमेल केले आणि त्यांचे धर्मांतर करण्यास भाग पाडले. दिल्लीतील लाल किल्ल्यावरील बॉम्बस्फोटात अल फलाह विद्यापीठाशी संलग्न असलेल्या जिहादी मानसिकतेच्या मुस्लिम डॉटरांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. देशभरात संरक्षित जमिनींवर पद्धतशीरपणे अतिक्रमण केले जात आहे.
 
 
vhp
 
VHP, Bajrang Dal hold sit-in protest  त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला थेट आव्हान निर्माण झाले आहे. समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने अन्नपदार्थांची विटंबना करण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मुस्लिमबहुल भागांमध्ये, अल्पसंख्याक हिंदू कुटुंबांतील आणि आदिवासी समुदायांतील अल्पवयीन मुलींचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले जात आहे आणि त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे. अशा राष्ट्रविरोधी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कठोर आणि दंडात्मक कारवाई करावी, सार्वजनिक आणि सरकारी जमिनींवरील सर्व अवैध अतिक्रमणे तात्काळ हटवावी, लव्ह जिहाद आणि सतीच्या धर्मांतरासारख्या कृत्यांना आळा घालून कठोर केंद्रीय कायद्यांची अंमलबजावणी करावी, आदिवासी भागांमध्ये होणारे शोषण थांबवण्यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा विकसित करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. देशात शांतता आणि सलोखा टिकून राहावा यासाठी प्रशासनाने या समाजकंटकांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी करण्यात आली. अटल पांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात अरविंद कोकाटे, किरण उपाध्याय, विजय छंगानी, संजय पोफळी, पंकज ढाकुलकर, अभिजित कुसाराम, अश्विन साहू, आदी उपस्थित होते.