व्हिडिओ क्लिपिंगच्या माेबदल्यात आठ लाख उकळले

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
- स्पा सेंटरच्या मालकाला केले ब्लॅकमेल

अनिल कांबळे
नागपूर, 
एका स्पा सेंटरच्या मालकाला त्याच्याच व्यवस्थापक व कर्मचाऱ्याने व्हिडिओ क्लिपिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन Video Clipping: Blackmail ब्लॅकमेल करत आठ लाख रुपये उकळले. सदर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. रेहानुद्दीन उर्फ शहाबुद्दीन (26, लक्ष्मीनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. ताे राॅयल ऑसेस, ऑरेंज स्पा, राॅयल मिन्ट व अ‍ॅम्बियन्स स्पा चालविताे. त्याच्या गावाजवळील अतिकुर उर्फ आलीकर रहमान उर्फ सुलतान अली (31, काहीकुशी, कामरू मेट्राे, आसाम) हा व्यवस्थापक व आशिक खान (26, काहीकुशी, आसाम) हा कर्मचारी म्हणून काम करत हाेता. कर्मचारी असल्याने, त्यांच्याकडे रेहानुद्दीनबद्दल विस्तृत माहिती हाेती.
 
 
Blackmail
 
Video Clipping: Blackmail  ‘आमच्याकडे तुझ्याबद्दल बरीच माहिती आहे. तसेच ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्ससुद्धा आहेत, आम्हाला पैसे दे नाहीतर आम्ही व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल करु’ अशी धमकी दिली. त्याबदल्यात आठ लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास ते व्हिडिओ मालकाची हाेणारी पत्नी आणि कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी त्यांनी दिली. 14 एप्रिल राेजी त्याने सदरमधील अचरज टाॅवरजवळ अतिकुर आणि आशिक यांना 8 लाख रुपये दिले. त्याने त्यांना कथित व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप डिलिट करण्यास सांगितले. मात्र, ते दाेघेही टाळाटाळ करू लागले. अतिकुरने पुन्हा 2 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर घाबरलेल्या रेहानुद्दीनने सदर पाेलिस ठाण्यात तक्रार केली. पाेलिसांनी दाेघांविराेधातही खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.