विरंगुळा ज्येष्ठ महिला मंडळाचा चैत्रोत्सव उत्साहात साजरा

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Virangula Jyeshtha Mahila Mandal लक्ष्मीनगर येथील सिद्ध हनुमान मंदिरात विरंगुळा ज्येष्ठ महिला मंडळाचा चैत्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. या निमित्ताने चैत्रगौरीची सुंदर आरास करण्यात आली होती. तिचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या नवीन सदस्यांनी स्वतःचा परिचय करून दिला.
 
Virangula Jyeshtha Mahila Mandal
 
कार्यक्रमात वसुधा शिलेदार यांनी ‘अमृतकण’मधून सुविचार मांडले, तर चित्रा डोके यांनी रामचरितमानसातील रामावताराशी संबंधित, परंतु फारसे प्रचलित नसलेल्या कथांचे प्रभावी निरूपण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. Virangula Jyeshtha Mahila Mandal कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अनघा फडके यांनी केले. शेवटी हळदी-कुंकू समारंभ पार पडला व उपस्थितांना आंब्याची डाळ आणि पन्हे देण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आशाताई गोखले, अध्यक्षा विजया विघ्ने तसेच कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी केले.
सौजन्य: संजीव डोके, संपर्क मित्र