यवतमाळ,
Yavatmal Urban Bank यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे रविवार, २६ एप्रिल रोजी येथील हॉटेल व्हॅनेशियन येथे विदर्भस्तर भव्य सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आहे. या सहकार परिषदेचे उद्घाटन रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांची राहणार आहेत.
Yavatmal Urban Bank या सहकार परिषदेचा समारोप सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर करणार आहेत. सहकार विदर्भातील सर्व नागरी सहकारी बँका व पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मु‘य कार्यकारी अधिकारी व संचालकांची उपस्थिती राहणार आहे. बँकेने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्य लक्ष्मणराव इनामदार स्मृती राज्यस्तर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. शालेय गट, महाविद्यालयीन गट, सहकार क्षेत्रात संचालक, कर्मचारी गट व खुला गट अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा आली होती. या स्पर्धेकरिता संपूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व गट मिळून जवळपास ३००० निबंध प्राप्त झाले आहेत. या निबंध स्पर्धेचा निकालदेखील या सहकार परिषदेत जाहीर होणार असून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल असे बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, उपाध्यक्ष अजिंदरसिंह चावला व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे सांगितले.