२३ गोवंशाचे वाहन पकडले
दत्तापूर पोलिसांची कारवाई
धामणगाव रेल्वे,
समृद्धी एक्सप्रेस हायवेवर होत असलेल्या Cattle smuggling गोवंश तस्करीविरोधात दत्तापूर पोलिसांनी शुक्रवार, १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता धडक कारवाई करीत मोठे यश मिळवले आहे. गोरक्षकांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गौवंशाची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे २३ गोवंश जप्त केले, तसेच तस्करीसाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेतले.
Cattle smuggling आरोपी अमीर अली रा. नागपूर याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाचविण्यात आलेल्या सर्व गोवंशाला तात्काळ सुरक्षिततेच्या दृष्टीने धामणगाव येथील गोरक्षण संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दत्तपूर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणामागील मोठ्या रॅकेटचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई दत्तपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या नेतृत्वात अतुल पाटील, मनोज धोटे, सागर कदम, भाऊराव कामडी, दीपक पंधरे, विक्रांत बोरचाटे, हरिहर वैद्य, तसेच इतर पोलिस कर्मचारी आणि गोवंश प्रेमी यांच्या उपस्थितीत पार पडली.