जिल्ह्यात १८ हजार महिला ‘लखपती दीदी’

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
महिला सक्षमीकरणाला हातभार

यवतमाळ, 
‘Lakhpati Didi’ scheme महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा शाखेमार्फत जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी व्यापक कार्य सुरू आहे. शासनाच्या ‘लखपती दीदी’ योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत, अशी माहिती यवतमाळच्या माविम कार्यालयाकडून देण्यात आली आहे. माविममार्फत १० तालुक्यांतील ४२१ गावांमध्ये स्वयंसहाय्य बचत गटांद्वारे विविध योजनांची अंमलबजावणी होत ‘नवतेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत ६८७६ बचत गटांमधून ७६,९६४ महिला संघटित झाल्या आहेत. बँकांकडून दरवर्षी सुमारे १२० कोटींचे कर्ज उपलब्ध होत असून परतफेड दर ९९ टक्के आहे.
 
 
lakhapati
 
कृषी सेवा केंद्र, शेळीपालन, दालमिल, हळद प्रकि‘या, गारमेंट्स आदी विविध व्यवसायांतून ४२,४६१ महिला उद्योजक बनल्या आहेत. १६ ‘ड्रोनसखी’ प्रशिक्षण घेत असून शेत फवारणीसाठी ड्रोन सेवा आहे. विविध निधीतून ई-रिक्षा, ड्रोन, कृषी अवजारे आदींसाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. ‘Lakhpati Didi’ scheme ‘लखपती दीदी’ योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेद्वारे महिलांचे वार्षिक उत्पन्न किमान १ लाख रुपये करण्याचा शासनाचा मानस आहे.
योजनेचे मुख्य  उद्दिष्ट :
स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे. ग्रामीण महिलांना उद्योजकता आणि तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना ‘लखपती’ बनवणे आहे.
योजनेचे प्रमुख फायदे :
‘Lakhpati Didi’ scheme  महिलांना स्वयंरोजगार, शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान आणि ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महिलांनी केलेल्या उत्पादनांना विक्रीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले जाते. जिल्हा उद्योग केंद्राची प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, कृषी विभागाची पीएमएफएमई योजना, मुद्रा योजनेतून मायक्रो एन्टरप्राईज निर्मितीकरिता कर्ज पुरवठा उपलब्ध केल्या जातो
बँक कर्ज :
स्वयंसहायता गटांसाठी २० लाख रुपयांपर्यंतचे विनातारण (गहाण न ठेवता) बँक कर्ज उपलब्ध केले जाते. तसेच महिला गटांनी घेतलेल्या कर्जांवर बँकांच्या कर्जदर आणि ७ टक्के यांतील फरक भागविण्यासाठी व्याज अनुदान दिले जाते. हे अनुदान प्रती स्वयंसहायता गट कमाल ३ लाख रुपयांपर्यंत आहे.

संपर्क :
ही योजना प्रामु‘याने महिलांच्या स्वयंसहायता गटांसाठी राबवली जाते. योजनेच्या माहितीसाठी जवळील अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा किंवा महिला आर्थिक विकास उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या समन्वयकांना भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.