तुमसर,
bike was burnt उन्हाचा पारा एवढा चढला आहे, की माणसाला घराबाहेर पडणे कठीण झाले आहेत. 42 पार केलेल्या या उन्हात माणसांसह वाहनांची अवस्थाही बिकट आहे. आज उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने तुमसर येथे एका दुचाकीने पेट घेतला आणि जळून खाक झाली.
तुमसर तालुक्यातील खापा चौकात घडलेल्या या घटनेने उन्हाची दाहकता पुन्हा एकदा सिद्ध केली. हा दुचाकी चालक नागपूर येथून बालाघाटकडे प्रवासासाठी निघाला होता. दुपारी दिड वाजताच्या सुमारास दुचाकी चालक खापा चौकात विश्रांतीसाठी थांबला होता. मोटरसायकल उभी असताना काही वेळातच तीने अचानक पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी मोठा स्फोट होऊ नये म्हणून पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला.bike was burnt मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. गाडीचा केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला. मोटरसायकल बजाज कंपनीची असून, या आगीत अंदाजे किंमत 1 ते दिड लाखाचे नुकसान झाल्याचे समजते.