वर्धा,
national dance festival नृत्य कलेला व कलाकारांना राष्ट्रीय स्तरावरील हकाचा रंगमंच उपलब्ध व्हावे, यासाठी गेल्या तीन वर्षापासुन सचिन डान्स अकॅडमी आणि लॉयन्स लब गांधी सिटीच्या नृत्योत्सवाचे आयोजन करण्यात येते. २० ते २२ दरम्यान नागठाणा येथील अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात नृत्योत्सव सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत आयोजित असल्याची माहिती पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी आज शनिवार १८ रोजी पत्रपरिषदेत दिली.
या नृत्योत्सवाचे उद्घाटन राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री राहतील. विशेष अतिथी म्हणून खा. अमर काळे, आ. अभिजित वंजारी, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, सामाजिक कार्यकर्ते मोहन अग्रवाल, नृत्योत्सवाचे स्वागताध्यक्ष संदीप चिचाटे, अनिल नरेडी, एस.एम.डब्ल्यू. इस्पातचे संचालक दीपक सुमड, वंदना भुते, महेश गुल्हाने, गणेश अतकर, शुभांगी ठमेंकर, अशोक झाडे, स्वाती लोणकर, मेधा नायर आदी उपस्थित राहतील.
या नृत्योत्सवात देशातील २५० नृत्य कलाकारांनी नोंदणी केली असून भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी, कुच्चीपुडी, मोहिनीअट्टम, सेमी लासिकल, वेस्टर्न, कंटेमनरी, आंध्रनाट्यम, रविंद्रनाट्यम असे विविध नृत्यप्रकार सादर केले जाणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश आदी राज्यातील आलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. वयोगट ४ ते ८, ८ ते १४, ५ ते २१ व त्यावरील मॉम स्पेशल खुला गट, स्कूल ग्रुप असे गटागटांत वर्गीकरण करण्यात आले आहे.national dance festival पहिल्या दिवशी ७० स्पर्धक, दुसर्या दिवशी १०० तर तिसर्या दिवशी ८० स्पर्धक आपली कला सादर करणार असून स्पर्धा संपताच लगेच विजेत्यांना पारितोषिकाचे वितरणही करण्यात येणार असल्याची माहिती पं. अग्निहोत्री यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला प्राचार्य गजानन जंगमवार, आशिष पोहाणे, लायन्य लबचे अनिल नरेडी, संदीप चिचाटे, नृत्योत्सव समितीच्या अध्यक्ष अपेक्षा वाकडे, मनीषा लोखंडे, मनोज तेलांडे, मनोहर देशपांडे, अतुल रुईकर, मोहन सायंकार, डॉ. प्रसाद जुमडे, आदी उपस्थित होते.