केंद्रीय कर्मचाऱ्याना ‘अक्षय्य’ दान

महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
dearness allowance केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाèयांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली. प्रस्तावित आठव्या वेतन आयोगांतर्गत वेतन रचनेत मोठे बदल करण्याच्या कर्मचारी संघटनेच्या मागण्यांच्या पृष्ठभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
da
dearness allowance नॅशनल कौन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने सरकारला सादर केलेल्या निवेदनात वेतन रचनेत मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. यात प्रामुख्याने 3.83 इतक्या उच्च ‘फिटमेंट फॅक्टर’ची मागणी आहे. ज्यामुळे मूळ वेतन 18 हजारांहून वाढून सुमारे 69 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकेल.
dearness allowance वेतन गणनेसाठी ‘कुटुंब’ या संज्ञेची व्याप्ती वाढवून त्यात अवलंबून असलेल्या पालकांचा समावेश करण्याचा प्रस्तावही या संघटनेने मांडला आहे. तसेच वेतनातील तफावतीवर मर्यादा घालण्याची आणि त्यासोबत उच्च वेतनवाढ आणि महागाईशी निगडित भत्ते देण्याची शिफारस केली आहे.