राष्ट्रीय महामाार्गालगतची १०९ झाडे तोडण्यास मनाई

* न्यायालयाचा जैसे थे चा आदेश * सागर कोकास यांच्या प्रयत्नाला यश

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
वाशीम,
ban on cutting trees येथील अकोला नाका परिसर ते हिंगोली मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या १०९ वृक्षांपैकी काही वृक्षांची तोड सुरू असल्याची बाब अर्जदार सागर कोकास यांचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ त्या १०९ वृक्षांना जीवदान मिळण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज व प्रतिज्ञा पत्र दाखल केले. या अर्जावर विद्यमान न्यायालयाने अर्जदारांच्या वकीलाचा युक्तीवाद ऐकून येथील प्र. सह दिवाणी न्यायाधीश एस.एस.सहस्त्रबुद्धे यांनी या प्रकरणातील प्रतिवादींनी तात्पुरत्या मनाई हुकुमाच्या अर्जावर सुनावणी होवून पुढील आदेश होईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवावी तसेच कोणतेही झाड तोडू नये, असा आदेश १६ एप्रिल रोजी पारीत केला आहे.
 

राष्ट्रीय महामाार्गालगतची १०९ झाडे तोडण्यास मनाई 
 
येथील विद्यमान दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचे न्यायालयात वृक्षप्रेमी सागर कोकास यांनी वाशीम पालिकेच्या हद्दीतील अकोला नाका परिसर ते हिंगोली रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सार्वजनिक १०९ झाडांची तोडणी करू नये याबाबत प्रकरण दाखल केले आहे. सद्या हे प्रकरण न्यायप्रवीष्ठ असताना प्रतिवादीकडून परिसरातील वृक्षांची तोडणी सुरु असल्याचे सागर कोकास यांचे निदर्शनास आले. कोकास यांनी तत्काळ न्यायालयामध्ये याबाबत अर्ज व प्रतिज्ञा पत्र सादर करून न्यायालयाच्या प्रतिवादीचे कृत्य निदर्शनास आणून दिले. या दाव्यात मूळ दावा निकाली लागेपर्यंत वाद मिळकतीवरील असलेल्या १०९ वृक्षांची जैसे थे परिस्थिती ठेवण्याबाबतचा आदेश पारीत करण्यात यावा अशी न्यायालयाला विनंती केली.
 
या प्रकरणात सर्व प्रतिवादींनी त्यांचे म्हणणे सादर केलेले नाही. त्यामुळे अंतरीम मनाई हुकुमाच्या अर्जाचा निकाल लागण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे वादीच्या म्हणण्याप्रमाणे जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश पारीत करणे योग्य ठरेल असा निष्कर्षही न्यायालयाने या प्रकरणात काढला आहे.ban on cutting trees त्यामुळे या प्रकरणातील प्रतिवादींनी तात्पुरत्या मनाई हुकुमाच्या अर्जावर सुनावणी होवून पुढील आदेश होईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवावी,तसेच कोणतेही झाड तोडू नये असा आदेश येथील प्र.सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस.एस.सहस्त्रबुद्धे यांनी १६ एप्रिल रोजी पारीत केला आहे.