अभय इंगळे
दिग्रस,
Birds' migration to water दिवसेंदिवस उन्हाचा वाढतच आहे. पाण्याचा नैसर्गिक स्रोत आटल्याने निसर्गाचा समतोल राखणारे पक्षी थेंबभर पाण्यासाठी भटकत आहेत तर पाणी न मिळाल्याने अनेक निष्पाप प्राणी व पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. पक्ष्यांना असणारी पाण्याची गरज, तिची तीव‘ता, पाण्याची उपलब्धता सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. पाणी न मिळाल्याने व पाण्याची सोय नसल्याने पक्षी व रानावनात मिळेल तेथून व मिळणार्या थेंबभर पाण्यासाठी नको तिथे व नको त्यातून पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे.
उन्हाळ्यात शहरांसह संपूर्ण ग्रामीण भागातील तापमान तापत आहे. रानावनातील प्राणी, पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शरीराची लाहीलाही होत असताना व पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने सांडपाणी, नाली, डबके, नळ व गळतीतून निरागस पक्षी आपली तहान भागवताना दिसत आहेत. या तापत्या उन्हामुळे जमिनीतील पाण्याचा नैसर्गिक स्रोत आटल्याने प्राणि व पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून, हा प्रश्न कोणी व कसा सोडवावा आणि हे अबोल पक्षी कोणाला आणि कसे सांगणार, असा प्रश्न आहे. उन्हाळ्यात मनुष्यप्राणी उष्णतेवर मात करू शकतो, कूलर, वातानुकूलन यंत्रे सुरू करुन, फ‘ीजमधील ‘चिल्ड’ पाणी पिऊन तो आपल्या परिवारासह ‘रिलॅक्स’ असतो. बाहेर पक्षी पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडताना दिसत आहे. पक्षी व प्राण्यांसाठी गावात व जंगलातही पाणपोईची गरज आहे, पक्षी वाचतील तर निसर्ग टिकेल आणि निसर्ग टिकेल तर आपण टिकू.
प्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याची करा
Birds' migration to water दैनंदिन इतके पाणी वाया जाते की त्यातून अनेक पक्ष्यांंच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. घरापुढे व छतावर पाण्याने भरलेले भांडे ठेवले तर अनेक निरागस पक्षी वाचू शकतात. आवारात झाड असेल तर त्यावर पक्ष्यांसाठी पाणपोई हा उपक्रम प्रत्येकाने राबविला पाहिजे. अनेक वस्तीत मोकाट कुत्रे, गाई तळपत्या उन्हात फिरत असतात. घराबाहेर पाण्याची व्यवस्था करणे कठीण नाही. घराबाहेर पाणी राहिल्यास अनेक मोकाट प्राणी, जनावरे आपली तहान भागवू शकतात.