ब्राह्मण समाज ‘भय सापळ्या’त अडकला

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
योग्य दिशा निवडण्याचे आवाहन

उमरखेड, 
Brahmin society भगवान परशुराम जन्मोत्सव २०२६ निमित्त शहरातील ब्राह्मण समाजाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमांत समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. शुक‘वार, १७ एप्रिल रोजी संध्याकाळी आयोजित प्रमुख व्याख्यानात ‘अ‍ॅनालायझर’चे संपादक सुशील कुळकर्णी यांनी ‘ब्राह्मण समाज : दशा व या विषयावर मार्गदर्शन करताना समाजाच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
 
 
Brahmin society
 
आजचा Brahmin society  ब्राह्मण समाज हा भय सापळ्यात अडकलेला आहे. जसा पोपट भीती दाखवून जाळ्यात पकडला जातो, तशीच समाजालाही भीती दाखवून दिशाभूल केली जात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले. शिक्षण व नोकरीनिमित्त समाज विखुरला असून आजही अनेक आरोपांना सामोरे जावे लागत अशा परिस्थितीत समाजाने एकजुटीने व आत्मविश्वासाने पुढे येऊन योग्य दिशा निवडली, तरच सकारात्मक बदल घडू शकतो. अन्यथा समाजाची स्थिती अधिकच बिकट होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. या कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी मधुसूदन पांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश महाजन, ज्ञानेश्वर साधू तसेच ब्राह्मण सेवा समितीचे अध्यक्ष संतोष देव व्यासपीठावर उपस्थित कार्यक‘माचे संचालन प्रशांत आयचित यांनी केले. आभार रोहिणी देशपांडे यांनी मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी मोठ्या संख्येने ब्रह्मवृंद उपस्थित होता.