डेहराडून
Chardham Yatra उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा शनिवारपासून सुरू झाली आहे. ऋषिकेशमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यमुनोत्री व गंगोत्री धामसाठी १० बस रवाना केल्या. हे यात्रेकरू १९ एप्रिल रोजी यमुनोत्री-गंगोत्रीचे दरवाजे उघडताना उपस्थित राहतील. चारधामसाठी आतापर्यंत १८.२५ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी २३ लाख भाविकांनी नोंदणी केली होती.
Chardham Yatra गुरुवारपासून ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये ऑफलाइन नोंदणी काउंटरही सुरू झाले आहेत. सर्वात आधी मध्य प्रदेश (शहडोल) येथील १०० यात्रेकरूंनी नोंदणी केली. हे सर्व यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दर्शन घेतील.
Chardham Yatra बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरात गैर-हिंदूंना प्रवेश बंदी असेल. हिंदू, बौद्ध, शीख, जैन धर्माचे लोक दर्शन करू शकतील. मात्र, इतर धर्माच्या लोकांना कसे थांबवले जाईल, याबाबत मंदिर समितीने स्पष्ट निर्देश जारी केलेले नाहीत.
केदारनाथच्या गर्भगृहात भाविक गंगाजल, फुले अर्पण करू शकणार नाहीत. मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितले की, विशेष पूजा दुपारी होणार नाही. ती रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत केली जाईल.
Chardham Yatra यात्रा मार्गावर वाहने पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंत धावू शकतील. त्यानंतर चेकपोस्टवर थांबवले जाईल. यात्रा मार्ग १६ सुपर झोनमध्ये विभागून ५४ हजार गाड्यांसाठी ११८ पार्किंगची व्यवस्था केली आहे.
Chardham Yatra केदारनाथमध्ये पायी यात्रा करण्यापूर्वी वृद्ध आणि बीपीचे रुग्ण गौरीकुंड येथे तपासणी करू शकतील. वास्तव्यासाठी ४८ ठिकाणे तयार केली असून नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत येथे १.१८ लाख लोक थांबू शकतात. भूस्खलनाची शक्यता असलेले ८० ठिकाणे चिन्हांकित केली. येथे आपत्कालीन पथके तैनात आहेत.