चेतन राठोड यांची एमपीएससीतून निवड

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Chetan Rathod वसंतराव राठोड व जिजाबाई वसंतराव राठोड यांचे पुत्र चेतन वसंतराव राठोड यांची एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या “सहाय्यक नगररचना अधिकारी” पदासाठी निवड झाली आहे. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.

chetan 
 
 
बंजारा समाजासाठी ही अभिमानास्पद बाब असून, या पदावर निवड होणारे ते समाजातील पहिले अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे समाजातील युवकांना नवी प्रेरणा मिळत आहे.Chetan Rathod चेतन राठोड यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
सौजन्य :ताराचंद चौव्हाण,संपर्क मित्र