देवळी
MLA Rajesh Bakane. Deoli नागरिकांच्या समस्या हे सरकारचे पर्यायाने आपले प्रथम कर्तव्य आहे. जनसंपर्क कार्यालयात सकाळी ९ वाजतापासुन भरगच्च गर्दी होती. काही नोकरी मागायला आले होते. दोघांना नागपूर येथील खाजगी कंपनीत रूजू करून येथे पोहोचलो. स्वत:पेक्षा कामाला प्राधान्य देण्यावर आपला भर आहे. माझ्या मतदार संघातील प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन आ. राजेश बकाने यांनी केले.
MLA Rajesh Bakane. Deoli तालुयातील गुंजखेडा येथे १७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी आ. राजेश बकाने बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार समर्थ क्षीरसागर, गटविकास अधिकारी प्रफुल लोखंडे, नायब तहसीलदार हेमा जाधवर, देवळी नपचे उपाध्यक्ष राहुल चोपडा, निलेश ठाकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
MLA Rajesh Bakane. Deoli आ. बकाने पुढे म्हणाले, शासनाच्या योजना व सेवा या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभपणे पोहोचल्या पाहिजे. प्रशासनाने गावपातळीवर जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविणे ही काळाची गरज आहे. अशा समाधान शिबिरांमुळे नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होतो असे ते म्हणाले. यावशळी त्यांनी सर्व विभागांना नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांवर तत्परतेने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. देवळी—पुलगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
MLA Rajesh Bakane. Deoli या शिबिरात महसूल, वीज, वन, ग्रामविकास आदी विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. गावकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडले व अनेक प्रकरणे जागीच निकाली काढण्यात आली.