चिमुकलीवर अत्याचार, आरोपीस आजन्म कारावास

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
मारेगाव, 
Child molestation मारेगाव पोलिस ठाणे हद्दीतील पहापळ एका नराधमाने ८ वर्षीय मुलीवर अत्याचार करून काट्याच्या फासामध्ये टाकून वरून दगड टाकले होते. अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी तत्कालीन ठाणेदार राजेश पुरी यांनी तपास करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. या प्रकरणी आरोपी मारोती मधुकर भेंडाळे (वय ३३) याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेत पीडिता आजीसोबत एका शेतात गेली होती. गावात हळदीचा कार्यक‘म असल्याने ग‘ामस्थ सोहळ्यात व्यस्त होते. अशातच या नराधमाची वक‘दृष्टी या ८ वर्षीय चिमुकलीवर गेली आणि त्याच्या कामवासनेची बळी ठरली.
 
 
co dksl
 
या नराधमाने या चिमुकलीवर अत्याचार करून सोडले नाही तर तिला जीवानिशी ठार मारण्यासाठी तिला चिलाटीच्या काट्याच्या फासात टाकून वरून दगड टाकले होते. मात्र दैव बलवत्तर शुद्धीनंतर पहाटे तिने ‘आजी आजी’ अशी हाक मारली असता तिचा शोध लागला. रात्री पीडितेचा ग‘ामस्थांमार्फत शोध सुरूच होता. चिलाटीच्या काट्यामधून आलेला आवाज शोधकर्त्यांच्या कानी पडला. तेव्हा तिला बाहेर काढले असता तिचे शरीर काट्याच्या जखमांनी रक्ताळलेले होते.
 
 
Child molestation  माणुसकीला काळीमा फासणार्‍या या हृद्रयद्रावक घटनेनंतर पीडितेच्या आई वडिलांनी तिला दवाखान्यात उपचार केला तिच्यासोबत या नराधमाने केलेल्या गैरप्रकाराचे बिंग फुटले. प्रकरण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय केळापूर येथे सुरू असताना १७ एप्रिलला सुनावणी झाली. न्या. अभिजित देशमुख यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि पुरावे ग‘ाह्य धरून निकाल जाहीर केला. यामध्ये १७ साक्षीदार तपासण्यात आले.
मरेपर्यंत जन्मठेप
नराधम भेंडाळे याला कलम ३६३ ७ वर्षे सश्रम कारावास, कलम ३६६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास, कलम ३७६ अन्वये आजन्म कारावास आणि नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली आहे.