८२९ कोटींच्या कामांना लवकरच मंजुरी
पालकमंत्री अतुल सावे यांची माहिती
श्रीक्षेत्र माहूर,
Development of Shrikshetra Mahurgad श्रीक्षेत्र सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या ८२९ कोटी रुपयांच्या कामांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले. शुक‘वार, १७ एप्रिल रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहूरगडच्या विकासासाठी ८२९ कोटी रुपयांचा निधी केला आहे. या निधीअंतर्गत प्रस्तावित विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून, वनविभाग व पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार आवश्यक त्या दुरुस्त्या करून विकासाला गती दिली जाईल.
रेणुकामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निधी अभावी रखडलेल्या मिशनच्या कामांसंदर्भात नुकतीच गुलाब पाटील यांनी बैठक घेतली असून लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती लवकरच केली जाईल, असे ते म्हणाले.
पत्रपरिषदेपूर्वी अतुल सावे यांनी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, सहायक जिल्हाधिकारी जेनीतचंद्रा दोन्तुला, अपर पोलिस अधीक्षक अर्चना यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीपूर्वी पालकमंत्री सावे यांनी दत्तशिखर संस्थानात जाऊन भगवान दत्तात्रेयांचे दर्शन तसेच डॉ. धनेश्वर भारती महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी रेणुकामाता मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.
Development of Shrikshetra Mahurgad यावेळी शिवसेना शहरप्रमुख विकास कपाटे व व्यापार्यांच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या राठोड, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पद्मा गिर्हे, शहराध्यक्ष स्वाती आडे, जिल्हा उपाध्यक्ष कांत घोडेकर, अनिल वाघमारे, फिरोज पठाण, विलास पाटील, मनीष राठोड, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या सं‘येने उपस्थित होते.