डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुक वादातून कुर्‍हाड व लोखंडी रॉडने हल्ला

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
मालेगाव, 
dr ambedkar jayanti तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणकीवरून झालेल्या वादातून मारहाणीची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी १३ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 

डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुक वादातून  
 
या प्रकरणी संदिप मारोती खिल्लारे वय ४२ रा. ब्राम्हणवाडा यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गावात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. १५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ ते ११.३० वाजताच्या दरम्यान आरोपींनी शोभायात्रेच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी तक्रारदार तसेच त्यांचे साथीदार विशाल विलास तायडे यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये गौतम सिताराम घुगे याने संदिप खिल्लारे यांच्या डोयावर कुर्‍हाडीने वार केला तर इतर आरोपींनी लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर व खांद्यावर मारहाण केली. यात त्यांचा पाय फ्रॅचर झाला. तसेच विशाल तायडे यांच्या डोयावरही कुर्‍हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले.
घटनेदरम्यान काही नागरिकांनी मध्यस्थी करून वाद शांत केला.dr ambedkar jayanti जखमींना प्रथम मालेगाव त्यानंतर वाशीम आणि पुढे अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. दिलेल्या तक्रारीवरून मालेगांव ठाण्यात आरोपी गौतम घुगे, शैलेन्द्र घुगे, सिद्धार्थ घुगे, प्रविण घुगे, शिवाजी घुगे, भिमचरण घुगे, आशा घुगे, भिमाबाई घुगे, राहुल घुगे, वंदना घुगे, आदित्य घुगे, संघर्ष घुगे तसेच रोहन घुगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक शिल्पा लोंढे करीत आहेत.