डॉ.आंबेडकर मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Dr. Ambedkar Marathon डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रीत्यर्थ मॅरेथॉन दौडचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने १४ एप्रिल रोजी, सकाळी ७ वाजता संविधान चौकातून तर दीक्षाभूमीपर्यंत मॅरेथॉन दौडला उदंड प्रतिसाद लाभला.
 
 
Marathon
 
समितीचे अध्यक्ष यशवंत तेलंग, सचिव योगेश ठाकरे, डॉ. शरद सूर्यवंशी, नगरारे, तसेच मान्यवर राजाभाऊ ताकसांडे यांनी स्पर्धेच्या पूर्वी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून या मॅरेथॉन दौडला सुरुवात झाली. विजेत्यांना रोख परितोषिक बक्षीस देण्यात आले व सर्वांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
Dr. Ambedkar Marathon मॅराथॉन स्पर्धा कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर यशवंत तेलंग यांनी विद्यार्थी धावपटू यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि विचारांची विचारांचा वारसा, आत्मसात केल्याने नवे विचार, प्रगती, नवे चैतन्य, कौशल्य, हे संविधानाच्या प्रेरणेतून निर्माण झाले. डॉ.आंबेडकर यांच्या विचारांची दौड जागतिक स्तरावर पोहचवली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. मॅराथॉन दौड़ या स्पर्धेला पंचशील ध्वज दाखविण्यासाठी व स्पर्धेप्रसंगी राष्ट्रीय धावपटू अंजली मडावी, कृष्णदत्त चौबे, डॉ. प्रज्ञय ताकसांडे, अनुपमा तेलंग, प्रा.विजय बारसे मान्यवर उपस्थित होते.