डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांतदर्शी विचार प्रमाण मानून लेखन करावे ः डॉ. अशोक इंगळे

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
वाशीम,
dr ashok ingle डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांतदर्शी विचार प्रमाण मानून कवी, लेखकांनी लेखन केले, तरच क्रांतदर्शित्व समाज निर्माण होऊ शकतो. सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचा बदल घडवून येण्यासाठी आजच्या विपरीत परिस्थितीत कवी, लेखकांनी आपली लेखणी परजली पाहिजे. आंबेडकरनिष्ठ असा शब्दप्रयोग मी जाणीवपूर्वक करतो. निष्ठेशिवाय मानवी जगण्याला अर्थ नसतो, असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून समीक्षक, विचारवंत,ज्येष्ठ कवी, डॉ.अशोक इंगळे यांनी प्रतिपादन केले.
 

dr ashok ingle 
 
 
साहित्य संमेलनाचे उद्घाटन यावेळी ज्येष्ठ कवी यशवंत लोकनाथ यांनी केले. शोषित, पिढीतांचे प्रश्न आपल्या कवितेचा विषय झाले पाहिजे. सामान्य माणसांचं जगणं हा जागतिक कवितेचा विषय व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाच्या प्रारंभी, सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून संविधान फेरीने प्रारंभ झाला. यावेळी आंबेडकरी कलावंतांनी विविध रचना सादर केल्या आणि संविधान फेरीमध्ये ऊर्जा वाढवली.
 
यावेळी प्रज्ञाविचार मंचावर आंबेडकरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अनंत जुमडे होते. प्रमुख उपस्थिती पद्मकुमार राऊत, तेजराव वानखेडे, दौलत हिवराळे, ठाणेदार श्रीदेवी पाटील, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे आदींची उपस्थिती होती. यावेळी वत्सगुल्मी या मीनाक्षी नगराळे यांनी संपादित केलेल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागतगीत शाहीर धम्मानंद इंगोले, भास्कर गायकवाड यांनी सादर करुन संमेलनात रंगत आणली. प्रास्ताविक ग. ना. कांबळे यांनी केले. संमेलनाची भूमिका कवी, अनिल कांबळे यांनी मांडली. दरम्यान शेषराव पिराजी धांडे यांना त्यांच्या समग्र कवितेसाठी प्रज्ञा साहित्य संघ वाड्मय विशेष पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.dr ashok ingle ज्येष्ठ साहित्य नागनाथ डोलारे यांनाही जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन, अरविंद उचित यांनी केले.आभार विष्णू लोंढे यांनी मानले.
 
ज्येष्ठ साहित्यिक सुदाम सोनुले यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडले. ’मी रमाई बोलते’ हे एकपात्री नाटक प्रा. दिपाली गवई यांनी ज्येष्ठ, कवयित्री,विमल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सादर केले. सूत्रसंचालन आणि ठरावाचे वाचन महेंद्र ताजणे यांनी केले. आभार मोहन शिरसाठ यांनी मांनले. यावेळी यावेळी शेषराव धांडे, ग. ना कांबळे शालिक वानखेडे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. शेवटी आभार मोहन शिरसाट यांनी मानले.