“पढे हम, पढ़ाये हम” उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आधार

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Fikr Foundation युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी आणि फिक्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८ पासून गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

pind
 
 
सिव्हिल लाईन परिसरात नुकतेच विशेष अध्यापन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन करत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक दिशा देण्यात आली. Fikr Foundation या उपक्रमाला स्थानिक नागरिक व स्वयंसेवकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांना सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.
 
सौजन्य:अश्विनी वानखेडे,संपर्क मित्र