हिंगणघाट,
fire breaks तालुक्यातील कडाजना ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या कुकाबर्डी येथे भीषण आग लागून मोलमजुरी करणार्या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले. संभा गोविंद नन्नावरे यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून अन्नधान्याचीही राखरांगोळी झाली आहे. या आगीत घरातील चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. ही घटना आज शनिवार १८ रोजी सकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुकाबर्डी येथील संभा नन्नावरे हे पत्नी व इतर असे ५ सदस्य असून मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे झोपडीवजा घर असून तिथेच त्यांच्या चार शेळ्याही बांधून असतात. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास अचानक घराला आग लागली. यावेळी सर्व कुटुंबीय घरातच होते. आग लागल्याचे लक्षात येताच कुटुंबीय घराबाहेर पळत सुटले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच शेजार्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग इतकी भीषण होती की घरातील सर्व वस्तूंची राखरांगोळी झाली.fire breaks आग आटोयात आणण्याकरिता स्थानिक नागरिकांनी मोठी मदत केली. यावेळी अग्निशमन दलाला सुद्धा पाचारण करण्यात आले.
या घटनेमुळे नन्नावरे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा आधारच हिरावला गेला आहे. मोलमजुरी करून संसार चालवणार्या या कुटुंबावर संकट कोसळले असून प्रशासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सहा शेळ्यांपैकी चार शेळ्या आगीत भस्मसात झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य, गृहोपयोगी वस्तूंची राख रांगोळी झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.