उमरखेडात १६ जुगार्‍यांना अटक

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
९.८७ लाखांचा जप्त

उमरखेड, 
Gamblers arrested in Umarkheda तालुक्यातील बेलखेड पांदण शेतशिवारात एका फार्म हाऊसवर रंगलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईल धाड टाकत मोठी कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळ काढला. मात्र १६ जणांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत तब्बल ९,८७,०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. उमरखेड पोलिस ठाणे हद्दीतील बेलखेड पांदण परिसरातील शेतशिवारात राजू कवाणे यांच्या फार्म हाऊसमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे शुक‘वार, १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी काही आरोपींनी अंधाराचा व परिस्थितीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ तर १६ जणांना जागीच पकडण्यात आले.
 
 
Atak
 
Gamblers arrested in Umarkheda त्यामध्ये सूरज गुप्ता बाळदी, नितेश राठोड दत्तबर्डी, ग्यानबा चिकणे टेंभी, टिकाराम चव्हाण दत्तबर्डी, सय्यद रसूल सय्यद मुसा उमरखेड, संतोष जोगदंड, मनोहर जाधव कोळी, सोहेल अली तिवरठा, पाशा सय्यद रहिमोद्दीन देगलूरफाटा, शिवाजी कदम बैसा, अशोक शिंदे मिरकसवाडी, शेख शहबाज शेख रफीक खडकपुरा, शेख रमजान फरीद उमरखेड, शेख बादशहा शेख हुसेन राणीधानोरा, नारायण चव्हाण नांदेड, शरद राठोड ढाणकी यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान आरोपींकडून ८,०२,०४० रुपये रोख, १० मोबाईल फोन ६५,००० रुपये, ८ मोटारसायकली १,२०,००० रुपये असा एकूण ९ लाख ८७ हजार ०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला असून जप्त मुद्देमाल व आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक सतीश चवरे व त्यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली.