भरारी पथकाची मोठी धडक कारवाई

हातभट्टी दारू रॅकेटचा पर्दाफाश

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
कल्याण
illegal liquor racket राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कल्याण परिसरात गावठी दारूच्या अवैध वाहतूक व पुरवठा करणाऱ्या रॅकेटवर मोठी कारवाई करत सुमारे तीन हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, एकूण ७.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 

Maharashtra State Excise Department raid, illegal liquor racket busted, Kalyan illicit liquor seizure, 
रविंद्र बबन भोईर आणि नयन मुकुंद म्हात्रे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १६ एप्रिल २०२६ रोजी भिवंडी बायपास, मुंबई–नाशिक महामार्गावरील राजनोली गाव परिसरात सापळा रचण्यात आला होता.
रात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली करणारी पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप कार पथकाच्या निदर्शनास आली. अधिकाऱ्यांनी तातडीने त्या वाहनाचा पाठलाग करत तपासणी केली असता, वाहनाच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारूचा साठा आढळून आला.
तपासणीदरम्यान ७० गोण्यांमध्ये ठेवलेल्या ३०० प्लास्टिक पिशव्यांमध्ये illegal liquor racket  प्रत्येकी सुमारे १० लिटर प्रमाणे दारू भरलेली असल्याचे स्पष्ट झाले. एकूण सुमारे तीन हजार लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे.चौकशीत आरोपींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही गावठी दारू ठाणे जिल्ह्यातील देसाई गाव परिसरात अवैधरित्या तयार करून नाशिक जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात होती. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या दारू निर्मात्यांपासून पुरवठादार आणि खरेदीदारांपर्यंत संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढील तपास सुरू केला आहे.या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.