स्वादिष्ट खरबुजांनी रंगला धारणीचा बाजार

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
मेळघाटचा तापी मेवा उपलब्ध
 
धारणी, 
Melon market आधुनिक पद्धतीने फळशेती आता मेळघाटात सर्वत्र सुरू झाल्याने उन्हाळ्यात रसाळ व गोड खरबूज व टरबुजांची आवक मोठ्या प्रमाणात असताना पण खास देशी (गावरान) वाणाचे खरबूज आताही लोकप्रियतेच्या शिखरावर कायम आहेत.
 
 
kharbuj
 
Melon market  सध्या बाजारात तापी नदीच्या रेताळ पात्रात पिकविलेले विविधरंगी गोल लांबट खरबुज सर्वांचे आवडते झालेले आहेत. ५० रुपये किलोप्रमाणे तापी नदीच्या काठी राहणारे आदिवासी धारणीच्या बाजारात ही खरबुजे विकत आहेत. सामान्य खरबुजांपेक्षा जास्त महाग ‘तापी का मेवा’ सध्या खवैय्यांसाठी एक संधी आहे. परतवाडा-अमरावती शहरात राहणारे शासकीय कर्मचारी शनिवारी घरी परतताना तापीचा मेवा सोबत घेऊन जात आहेत. एका माहितीनुसार, तापी नदीच्या भूगर्भीय वेगळ्या स्थिती किंवा गुणधर्मामुळेच नदीच्या पात्रात रेताळ भागात जमिनीत साचून असलेल्या पाण्याच्या जोरावर हे खरबूज उत्पन्न होत असतात. फळातील रसाळपणा आणि स्वाद अगदी वेगळाच राहतो. यामुळे जेमतेम ४० दिवसच या खरबुजांचा हंगाम असतो.
(एएम १८ एपी- खरबूज)