वर्धा
Mogra Phulla Wardha संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने वर्धेत ‘मोगरा फुलला’ या विशेष सांस्कृतिक मैफिलीचे आयोजन सोमवार २० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
Mogra Phulla Wardha संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या अद्वितीय विचारसंपदेचा वेध या मैफिलीच्या माध्यमातून व्याख्याते व निरुपणकार गणेश शिंदे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर सखोल प्रकाश टाकणार असून त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सामाजिक आणि आध्यात्मिक प्रभाव उलगडून सांगणार आहेत. यासोबतच सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे भजन, गवळण, भारूड आणि अभंगांच्या सादरीकरणातून कार्यक्रमाला सुरेल आणि भावस्पर्शी आयाम देणार आहेत.
Mogra Phulla Wardha यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जिल्ह्यातील नागरिक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.