नागपूर,
Nagpur News तप्त उन्हात, धूळ आणि सिमेंटच्या वातावरणात एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. अवघी दोन वर्षांची एक छोटी मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत रस्ता बांधकामाच्या कामात मदत करताना दिसली. तिच्या वयाला अजून जगाची किंवा ‘जबाबदारी’ या शब्दाची पूर्ण जाणीव नसली, तरीही आपल्या आई-वडिलांना हातभार लावण्याचा तिचा निरागस प्रयत्न लक्ष वेधून घेत होता.
या प्रसंगामुळे शिक्षणाच्या खऱ्या अर्थाबाबत प्रश्न उपस्थित होतो. शिक्षण नक्कीच महत्त्वाचे आहे, मात्र ते केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून, त्यातून प्रेम, आदर आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होणेही तितकेच गरजेचे आहे. अनेकदा उच्च शिक्षण घेतलेले लोकही आपल्या कुटुंबापासून दूर जाताना दिसतात.
दुसरीकडे, या चिमुकलीला कदाचित अक्षरांची ओळखही नसावी, तरीही आई-वडिलांसोबत उभे राहण्याचे मूल्य तिला नकळत उमजले आहे. Nagpur News त्यामुळे खरे शिक्षण केवळ पुस्तकांमध्ये नसून, ते संस्कारांमधून आणि जीवनातील अनुभवांतून घडत असते, हेच या घटनेतून अधोरेखित होते.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र