बेवारस मृतदेहावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
माणुसकीचा जिवंत आदर्श

यवतमाळ, 
Nanddeep Foundation दारव्हा मार्गावरील लोहारा चौक येथे घडलेली एक अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून घटना समाजासमोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून एक इसम बेवारस अवस्थेत मृत पडलेला आढळून आला. पोलिस प्रशासनाने तत्परतेने त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला आणि संपर्कही साधला. मुलगी, पत्नी, तसेच इतर कुटुंबीय नातेवाईक उपस्थित झाले. परंतु दुर्दैवाने केवळ मृतदेहाची पाहणी करून कोणतीही जबाबदारी न स्वीकारता ते तेथून निघून गेले. मृत व्यक्तीच्या कोणीही पुढे आले नाही.
 
 
dead
 
या गंभीर आणि संवेदनशील परिस्थितीत शहर पोलिस अधिकारी अविनाश गोदमले यांनी Nanddeep Foundation नंददीप फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ प्रतिसाद देत जबाबदारी स्वीकारली. फाऊंडेशनच्या वतीने शववाहिकेची व्यवस्था करून हा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. ओळख पटविताना हा मृतदेह गणेश शेणोय असल्याचे स्पष्ट झाले. विशेष बाब म्हणजे, सुमारे दीड वर्षांपूर्वी याच व्यक्तीस नंददीप फाऊंडेशननेच बेवारस अवस्थेत उचलून आणून उपचार, निवारा व पुनर्वसन देत नवजीवन दिले होते.
 
 
Nanddeep Foundation उपचारानंतर गणेश शेणॉय यांनी स्वतःच्या पायावर उभे राहत राजनंदिनी हॉटेल येथे काम सुरू केले होते. अलीकडेच त्यांनी नंददीप फाऊंडेशनला १००० ची देणगी देत, पुढेही महिन्याला मदत करण्याचा संकल्प व्यक्त केला होता. हीच त्यांची शेवटची देणगी ठरली. अत्यंत दुःखद बाब म्हणजे, जिवंतपणी संघर्ष करत उभे राहिलेल्या या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. अशा परिस्थितीत ‘नंददीप’चे संदीप शिंदे, निशांत सायरे, तसेच बेघर मनोरुग्ण प्रभूजी जोगेंद्र भगत, विजय कुळझरकर, विशाल काकडे, कृष्णा मुका, मोहम्मद पुढाकार घेत गणेश शेणॉॅय यांना सन्मानपूर्वक खांदा देत अंत्यसंस्कार पूर्ण केले. या वेळी शहर पोलिस ठाण्याचे अविनाश गोदमले, योगेश टेकाम, राजनंदिनी हॉटेलचे मालक पप्पू पलटणकर, सामाजिक कार्यकर्ते रजिया शहा, अविनाश मोहदरकर, नगर पालिका कर्मचारी इरफान जब्बार, मंगेश आत्राम मान्यवर उपस्थित होते.