परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा आज

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
नागपूर, 
Parshuram jayanti परशुराम सर्व भाषीय ब्राम्हण संघ, विप्र फाऊंडेशन तसेच शहरातील विविध ब्राह्मण संस्था संयुक्त विद्यमाने अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर परशुराम जन्मोत्सवाचा रजत महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. महिला मंचतर्फे रेणुका माता, माहुरगड़ येथून प्रज्वलित अखंड ज्योत १५ एप्रिल रोजी नागपुरात आली आहे. या अखंड ज्योतीचे दर्शन व्हावे, या हेतुने शोभायात्रचे आयोजन करण्यात येत आहे.
 

parshuram 
 
रविवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ६ पुष्करणा भवन, मेहता पेट्रोल पंपच्या मागे, लकडगंज येथून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात येईल. रोकडे ज्वेलर्सतर्फे प्रायोजित आकर्षक सिंहरथावर परशुरामजी विराजीत राहतील. रथपूजन व आरती त्रिलोकीनाथ सिधरा, रामकिशन (मुन्ना) ओझा, डॉ. महेन्द्र शर्मा, गिरीश व्यास, आ.कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके व समाजातील गणमान्य नागरिकांतर्फे करण्यात येणार आहे. रथासोबत सूरज शर्मा, पैलेश मयंक शर्मा व चमूद्वारे भजन प्रस्तुती करण्यात येणार आहे. शोभायात्रेत लोटस स्केटिंग ग्रुपचे राजेश पांडे यांच्या नेतृत्वात १००पेक्षा अधिक स्केटर्स आपली कला प्रस्तुत करतील. लोकजागृती मोर्चा व शिवशक्ति आखाडाचे हितेश डफ, तुषार कोंडलकर यांच्या नेतृत्वात आखाडा कला, दंडयुद्ध, तलवारबाजी इत्यादींचे जीवंत प्रदर्शन सादर करतील. गुजराथी ब्रम्ह समाजाचे पं. बृजेश के नेतृत्वात गरबा नृत्य प्रदर्शन होईल.
 
 
Parshuram jayanti महाकाल अघोरी नृत्य कला प्रदर्शन छिंदवाडाचे कलाकार सादर करतील. गायत्री परिवारातर्फे अमृत कलश रथावर वेदपाठ करताना वेदपाठी शोभायात्रेच्या मार्गात उपस्थित राहतील. शोभायात्रेच्या मार्गात विविध संघटनेतर्फे जलपान, अल्पोहारची व्यवस्था करण्यात आली आहे. परशुराम जन्मोत्सव अंतर्गत गौरक्षण सभा, रहाटे कॉलोनी, वर्धा रोड येथे १९ एप्रिल, सकाळी ९ वाजता परशुराम जन्मोत्सव, अभिषेक, पूजन, आरती तसेच परशुराम चालिसा पठण करण्यात येईल. शोभायात्रेच्या यशस्वितेसाठी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी या शोभायात्रेत सामिल होण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.